Patra Lihito me.. book and story is written by Nagesh S Shewalkar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Patra Lihito me.. is also popular in पत्र in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
पत्र लिहितो मी...! - कादंबरी
Nagesh S Shewalkar
द्वारा
मराठी पत्र
●●●●●● प्रिय मातेस पत्र !●●●●●● माझी प्रिय आई, तुला शतशः नमन।तुझे अनंत उपकार. केवळ तुझ्यामुळेच मी या सुंदर, रमणीय, मनमोहक जगात पाऊल ठेवू शकले. पण, खरे सांगू का आई, तुझ्या उदरात घालवलेला काळ जणू माझ्यासाठी स्वर्गात विहार करत असल्याप्रमाणे होता. तुझ्या पोटात असतानाही मी तुला भरपूर त्रास दिलाय ग! पण आई, तू तो सारा त्रास मोठ्या आनंदाने सहन तर केलासच पण कधी तुझ्या चेहऱ्यावरील समाधान कमी होऊ दिले नाही. तुझ्या पोटात असताना मी मस्त बागडायचे, खेळायचे, तुला मधूनमधून लाथाही मारायचे पण तू कधीच राग केला नाहीस की कधी
------------------- एक पत्र 'अटल' व्यक्तीमत्वास ! ---------- आदरणीय अटलजी, साष्टांग नमस्कार ! तुम्हाला पत्र लिहिताना 'काय लिहू ? कसे लिहू? कशी सुरुवात करू?' अशी अवस्था झाली आहे. ...अजून वाचाइकडे तिकडे झाले असतील परंतु तुम्ही अशीच भाषणाची सुरुवात करीत असत. तसेच काही प्रश्न मनालाच विचारून मी लिहितो आहे. मला आठवते, तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात करताना अनेक वेळा 'क्या बोलू? कैसे बोलू? कहाँ से शुरूआत करू?' अशा आशयाचे प्रश्न विचारून करीत असत. अटलजी, खरे सांगू का, मलाच काय परंतु भारतातील कोट्यवधी जनतेला तुम्ही आमच्यामधून कायमचे निघून गेला आहात असे वाटतच नाही. घरातील एखादी व्यक्ती सोडून गेली यावर जसा
●●●●●● प्रिय मातेस पत्र !●●●●●● माझी प्रिय आई, तुला शतशः नमन।तुझे अनंत उपकार. केवळ तुझ्यामुळेच मी या सुंदर, रमणीय, मनमोहक जगात पाऊल ठेवू शकले. पण, खरे सांगू का आई, ...अजून वाचाउदरात घालवलेला काळ जणू माझ्यासाठी स्वर्गात विहार करत असल्याप्रमाणे होता. तुझ्या पोटात असतानाही मी तुला भरपूर त्रास दिलाय ग! पण आई, तू तो सारा त्रास मोठ्या आनंदाने सहन तर केलासच पण कधी तुझ्या चेहऱ्यावरील समाधान कमी होऊ दिले नाही. तुझ्या पोटात असताना मी मस्त बागडायचे, खेळायचे, तुला मधूनमधून लाथाही मारायचे पण तू कधीच राग केला नाहीस की कधी
-------------------------------*एक पत्र डिजिटल इंडियास!* ---------------------- ...अजून वाचा नागेश सू. शेवाळकर, थेरगाव, पुणे. ४११०३३
॥॥॥॥॥॥॥ पोस्टमनकाकांना पत्र ! ॥॥॥॥॥॥ प्रिय पोस्टमनकाका,स. न. वि. वि. आम्हा नागरिकांच्या मनात तुमचे काय स्थान आहे हे शब्दात नाही सांगता येणार. पण एक मात्र नक्की, देव जर खरेच असला ...अजून वाचातर त्यानंतर तुमचीच जागा आमच्या ह्रदयात असणार. आमच्या परिसरात तुमचे आगमन होताच, तुमच्याकडे सारे आशाळभूत नजरेने पाहतात. कुणी कितीही घाई-गडबडीत असला तरीही 'आपले काही पत्र ' आले तर नाही ना या आशेने तुमच्या समोरून जातांना रेंगाळतात. काही जण विचारतातही, 'साहेब, माझे काही आहे का?' ज्यांचे काही येणार आहे असे विद्यार्थी, नोकरीच्या शोधात असलेले तरुण, कामानिमित्ताने दूर गेलेल्या व्यक्तींंच्या
:::::::::::::::::::::::::::एका निर्भयाचे पत्र :::::::::::::::::::प्रति,नीच दुष्क्रुत्य करणारांनो,यापेक्षा दुसरी उपमाच सूचत नाही रे तुमच्यासाठी! मी एक निर्बल निर्भया! गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठेही तुम्हा लांडग्यांच्या तावडीत सापडणारी, तुमच्या अत्याचाराला, अनैतिक वासनेला बळी पडणारी, विक्रुत चाळे सहन करणारी ! जशी मी कुठेही असते, कुठेही ...अजून वाचासहजासहजी सापडू शकते तसेच वासनांधानो तुमचाही वावर सर्वत्र असतो. तुमची सावध, शोधक नजर एखाद्या पाखराला शोधत असते. तुमचे सुदैव आणि आम्हा निष्पाप निर्भयांचे दुर्दैव असे की, मनी वसे ते समोर दिसे याप्रमाणे आम्ही तुमच्या तावडीत सापडतो. भुकेल्या वाघाने एखाद्या शेळीवर तुटून पडावे तसे तुम्ही आम्हा निर्भयांवर तुटून पडता. तुम्हाला स्थळ, वेळ, काळ यापैकी कशाचेही भान राहात नाही. आपले नीच काम