वन नाइट स्टॅंड

(283)
  • 51.2k
  • 46
  • 16.1k

तस रात्रीचे नऊ वाजलेले फक्त पण अफाट कोसळणाऱ्या त्या पावसामुळे मध्यरात्रीचा फील येत होता. प्रकाशला तसपण पाऊस आवडायचा नाही. त्यात ह्या अशा मुसळधार पावसात गाडी चालवायला समोर काही नीट दिसत पण नाही. शहराबाहेरच्या रस्त्यावर सगळंच बिन भरवश्याच. कधी कुठून एखादा दगड कोसळेल किंवा दरड काही सांगता नाही येत. वैतागत आणि मॅनेजमेंटला शिव्या देत तो हळू हळू गाडी चालवत होता. पुढे दूरवर कुठेतरी एखादी स्ट्रीटलाईट मिणमिणत होती. तेव्हढ्याशा प्रकाशात त्याला पुढे कोणतीतरी गाडी उभी असल्याचं जाणवलं. त्याने जवळ नेत आपली गाडी थांबवली. हि गाडी कुठेतरी पाहिलीय असं विचारच करत होता तेवढ्यात त्या गाडीतून कोणीतरी युवती बाहेर आली आणि प्रकाशच्या गाडीच्या काचेवर टकटक करू लागली.