आजच्या विद्यार्थ्यामधील थोरा-मोठ्याबद्दल संपलेला आदर आणि बेशिस्त यामुळे राजाभाऊ उदास झाले होते. अनेक सामाजिक उपक्रमामध्ये राजाभाऊ प्रमुख भूमिका बजावत. वेगवेगळ्या सभा- संमेलनामध्ये मुलांमधील बदलणारे संस्कार, पालकांचे अतिलाड,टी.व्ही आणि मोबाईलचा अतिवापर याबद्दल ते आपले मत व्यक्त करत होते. हे सगळे घातक बदल त्यांना मान्य नव्हते. राजाभाऊ स्वेच्छ्या सेवा निवृत्ती घेत आहेत हे कळाल्यानंतर अनेक वर्षे घरगुती संबंध असणारा आणि ज्याला राजाभाऊ आदर्श शिष्य मानत होते असा राजाभाऊंचा माजी विद्यार्थी विनयला ही बातमी बातमी समजल्यानंतर विनय राजाभाऊंच्या भेटीसाठी आला होता. राजाभाऊ पुस्तक वाचत खिडकीजवळ बसले होते. विनय येत आहे हे त्यांनी पाहिले. पुस्तक ठेवून राजाभाऊ बाहेर आले. पुन्हा आत जाऊन विनयसाठी पाणी घेवून आले. विनयला पाणी देवून न बोलताच गडबडीने पुन्हा गुरुजी आत गेले. विनय फक्त पाहत होता. त्याला काहीच कळत नव्हते. गुरुजी बाहेर आले.