मृगजळ ( भाग -2)

(49)
  • 15k
  • 6
  • 5k

ऋतुजाच घर आलं .... घराच्या समोर कार पोहचताच ती श्री ला म्हणाली ," थांबवा .... आलय माझं घर very very thanx तुम्ही नसते आलात तर अद्यापही मी तिथेच थंडीत कुडकुडत बसलेली असती सरीना झेलत .... "तिला गोड स्माईल देतं , " सांभाळून जा ! " एवढच म्हणतं त्याने गाडी सुरू केली .....गेट उघडून आत शिरतचं ऋतुजा स्वतः शीच पुटपुटली ," संभाळून जा म्हणे ..... हं ह्या वाक्याची गरज तर मला नसून त्यांना होती ..."ऋतुजाचे घरात पाऊल पडताचं ," काय हे ऋतुजा कुठे थांबली होती एवढ्या पाऊसात अंग आशुतोष कधीचा कॉल करतोय तुला रिसिव्ह करून सांगायच तरी , आम्ही किती टेन्शन मध्ये होतो इकडे माहितीये