निर्भया- १३ सुशांतने दीपाला फोन केला आणि दुसऱ्या दिवशी येणार असल्याचं सांगितलं. ते तिच्या घरी गेले, तेव्हा ती त्याची वाट बघत होती. गेल्या काही दिवसांत तिने सुशांतच्या स्वभावातले अनेक पैलू पाहिले होते. त्यांचा धाडसी स्वभाव, बुद्धिमत्ता यांची स्तुती नेहमीच वर्तमानपत्रात वाचायला मिळत होती पण त्याचबरोबर तो किती सहृदय आहे हे तिने स्वतः अनुभवलं होतं. तिला तिच्या दु:स्वप्नातून बाहेर काढण्यासाठी त्याने किती प्रयत्न केले होते, हे ती विसरू शकत. नव्हती. राकेशच्या आई - वडिलांकडून नक्कीच तिच्याविषयी सर्व माहिती त्याला मिळाली