अलवणी - २

(77)
  • 52.5k
  • 13
  • 41k

सर्व कपडे उतरवल्यावर ती सावकाश चालत आकाशच्या जवळ आली. घामाने तिचे शरीर ओलेचिंब झाले होते तर आकाश मात्र हुडहुडी भरल्यासारखा पांघरुणात बुडुन गेला होता. तिने आपले ओठ आकाशच्या ओठांवर ठेवले. एखाद्या गरम इस्त्रीचा स्पर्श व्हावा तसा चटका आकाशच्या ओठांना बसला. त्याने स्वतःला तिच्यापासुन बाजुला करण्याचा प्रयत्न केला, पण शाल्मलीच्या घट्ट मिठीतुन त्याला निसटणे अशक्य झाले होते. इतक्या वर्षात प्रथमच शाल्मलीने प्रणयक्रिडेमध्ये स्वतःहुन पुढाकार घेतला होता. आकाशने फारसा प्रतिकार न करता स्वतःला तिच्या स्वाधिन करुन टाकले. साधारणपणे तासाभरानंतर आकाश तृप्त चित्ताने पहुडला होता. इतक्या वर्षात प्रथमच त्याने शाल्मलीबरोबरचा शृंगार इतक्या उत्कटतेने अनुभवला होता. नेहमी अ‍ॅट्रॅक्टीव्ह भासणारी शाल्मलि आज नुसतीच अ‍ॅट्रॅक्टीव्ह नाही तर सिडक्टीव्ह पण भासली होती.