बम्पी राइड - 2

  • 3.3k
  • 1
  • 1.4k

त्या दिवशीचा तो प्रवास मला आजही चांगलाच आठवतो. गावातल्या घरच्या अंगणात बसलो की अगदी काल घडल्याप्रमाणे तो प्रसंग मा‍झ्या मनात येतो. “अरे बॅग भरलीस का? चार वाजून गेलेत. उशीर होतोय. उद्या ऑफिसला दांडी मारणार आहेस का?” – बायको म्हणाली. दारातून ओरडलीच म्हणाना. तिचाही स्वर निर्वाणीचा इशारा द्यावा तसाच होता. प्रकरण गंभीर आहे हे ओळखून मी हातातील चहाचा कप बाजूला ठेवून अंगणातील झोपाळ्यावरून उठलो. बायकोचा संवाद आणि स्वर नेहमीचाच ठेवणीतला असल्यामुळे नकळत गालावर हसू उमटले. ते आईने समोरच्याच आराम खुर्चीत बसून बरोबर हेरले आणि त्याच वेळी मी तिच्याकडे बघितल्याने आम्ही दोघे मोठ्याने हसणे आवरू शकलो नाही. हे पाहून बायको काहीतरी पुटपुटत