५. तारकर्ली - मस्त समुद्र किनारा, लख्ख सूर्यप्रकाश आणि वॉटर स्पोर्ट्स..

(15)
  • 12.2k
  • 2
  • 4k

५. तारकर्ली - मस्त समुद्र किनारा, लख्ख सूर्यप्रकाश आणि वॉटर स्पोर्ट्स.. विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा, पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू, कोवळे उन. स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असेल? तारकर्ली किनारा असाच अनुभव देतो. तारकर्ली किनार्‍यावर गेल्यानंतर या स्वर्गाचा अनुभव येते. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, बांबूची, सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होते. इथले समुद्र किनारे इतके स्वच्छ आणि नितळ आहेत की पाण्यातील सौंदर्य डोळ्यांनी पाहता येते. समुद्र किनारे नेहमीच माणसाला खुणावत असतात. भारतात तसे बरेच प्रसिद्ध समुद्र किनारे आहेत आणि महाराष्ट्रा मधील अत्यंत प्रसिद्ध किनारा हा तारकर्लीचा आहे. तारकर्ली महाराष्ट्राचे मॉरीशास म्हणून ओळखले जाते. मालवणपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर अतिशय स्वच्छ व सुंदर