६. भारतातल्या रोड ट्रीप्स- भाग १

  • 6.8k
  • 2
  • 3.5k

अश्या रोड ट्रीपचा थ्रील अनुभवण्याचा कल वाढलेला दिसतो आहे. गाडीत सामान भरून नाहीतर बाईकवर एक रस्ता धरायचा आणि सरळ सुटायचं!! जिथे वाट नेईल तिथे...भारत निसर्ग संपन्न देश आहे. विविधतेनी नटलेला देश आहे जे बाहेर पडल्याशिवाय अनुभवता येत नाही.. भारतातही असे काही कमी रस्ते नाहीत जे खास आहेत आणि तुमची ट्रीप सुंदर करतात! त्यातल्याच काही सुंदर, देखण्या आणि नवीन अनुभव देणाऱ्या रोड ट्रिप्स! आयुष्यात एकदातरी अनुभवाव्या अश्या रोड ट्रिप्स, ज्या आयुष्यात खूप काही नवीन दाखवून जातील. अश्या रोड ट्रिप्स मन प्रसन्न तर करतीलच पण खूप नवीन अनुभव देऊन जातील. निसर्गाच्या अधिक जवळ जाता तर येईलच पण त्या ठिकाणच्या लोकांशी सुद्धा तुमचा संवाद होऊ शकेल. फक्त रस्ते नवीन असतील त्यामुळे काळजी घेतली, थोडी माहिती आधी पाहून घेतली तर तुमचा प्रवास आनंददायी आणि सुखकर नक्कीच होईल. आणि अडचणी येणार नाहीत.