अलवणी - ५

(69)
  • 33.8k
  • 12
  • 17.8k

दहा वाजुन गेले तसे सर्वांनीच थोडं फार खाऊन घेतले आणि आपल्या पांघरुणात शिरुन झोपण्याचा प्रयत्न करु लागले. अर्थात झोप येणं अशक्यच होतं, पण दिवसभरातल्या घडामोडींमुळे शरीराला आणि मनाला थकवा आला होता त्यामुळे नकळतच सर्वांचे डोळे मिटले गेले. साधारणपणे रात्री १ वाजता कसल्याश्या आवाजाने आकाशला जाग आली. बर्‍याच वेळ तो कसला आवाज असावा ह्याचाच आकाश करत होता. जणु काही कोणीतरी झाडू मारत असल्याचा तो आवाज वाटत होता.. किंवा… किंवा कोणीतरी सरपटत चालण्याचा.. काशने हळुच हलवुन जयंताला जागे केले. जयंता लगेच उठुन बसला. दोघंही बाहेरील आवाज कान देऊन ऐकु लागले. तो आवाज हळु हळु जवळ जवळ येत होता. काही क्षणातच तो दाराच्या अगदी जवळ आला आणि मग तेथुन पुढे जिन्यापाशी गेला. हळु हळु तो आवाज दुर दुर गेला. बहुदा ते जे कोणी होतं ते जिन्याचा आधार घेउन वरच्या खोलीकडे चालले होते.