लघुकथा- सुरेखा---------------------------------------बेल वाजली ,सुरेखाने दरवाजा उघडला,बाहेर मनोज , तिचा नवरा उभा होता,गुरुवारी ऑफिस टूरसाठी गेलेला ,आज शनिवारी घरी आला होता, उद्या रविवार नसता तर हा आला असता का? मनोजला उभा पाहून ती स्तब्ध , आज याला आत घ्यायचे की नाही ? तिच्या चेहेर्यावर होणारे फेरफार पाहून तिच्या मनात घालमेल सुरु आहे ,हे त्याने ओळखले, आणि अगदी गयावया करीत, तिला हात जोडीत म्हणाला, सुरेखा,प्लीज, घरात घे मला, विस्वास् ठेव तू तुझ्या नवऱ्यावर,पुन्हा असे नाही होणार,मी बाहेर कुठे न थांबता मुक्कामी घरी येत जाईन, पक्का प्रॉमिस, मनोज हॉलमध्ये खुर्चीवर बसत म्हणाला-सुरेखा"- कुणी काही म्हटले तरी विस्वास् ठेवू नको, फक्त माझ्यावर विस्वास ठेव ,बाहेरचे लोक जळतात ग माझ्यावर, माझा