ठाकुरवाडी स्टेशन आणि त्याचा व तिचा निसर्ग

(11)
  • 7.4k
  • 1.9k

गाडी वळली.गाडी म्हणजे झुकझुकगाडी. निसर्गाच्या अनेक छटा दाखवल्या तिने.पुणं सोडलं.पिंपरी चिंचवड तळेगाव करीत गाडी पुढे आली.कानातल्या अडकवलेल्या इयरफोन्सवर मस्त गाणी ऐकत ती दंग झाली होती.जगाचं भानच नव्हतं उरलेलं तिला. चहा वडापाव कुरकुरे चिक्की असं काहीबाही येत होतं.पण तिचं त्यात लक्षच नव्हतं.समोरचा हळुवार निसर्ग पाहण्यात ती अक्षरशः गुंग झाली होती. तिचा सखा,तिचा निसर्ग,त्याच्यापलीकडे कुणी असू शकतं याचं तिला भानच नव्हतं. उच्चशिक्षित.परदेशात जाऊन पोस्ट डाॅक्टरेट करून आलेली.एकुलती एक.मित्र मैत्रिणींच्या गदारोळातही लाडकी.पण तिला फक्त आणि फक्त निसर्गच आवडायचा. गाडीतल्या गर्दीचं फारसं घेणंदेणं नव्हतं तिला. आरामदायी थंडगार डब्यातली खिडकीची जागा आरक्षित असल्याने ती आणि तिचा निसर्ग यांच्याआड कुणी नव्हतं. ठाकुरवाडीच्या स्टेशनवर गाडीची गती जरा