निर्भया - Part 15

(27)
  • 7.6k
  • 2
  • 3.7k

       निर्भया- १५.     आईच्या  विरोधाकडे   लक्ष  न  देता  सुशांतने  मूल दत्तक घेण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण  केले. त्याला  जो दोन  वर्षांचा   मुलगा-- सिद्धेश  आवडला होता त्याच्याविषयी बोलताना संचालक म्हणाले, "त्याचे आई- वडील गेल्या  वर्षी झालेल्या भूकंपात  दगावले. याची  एक  पाच  वर्षांची बहीण- शिल्पा, इथेच आहे आहे. जेव्हा  भावंडं  आमच्याकडे   असतात,  तेव्हा दोघांनाही  एकाच  घरात दत्तक द्यावे असा अामचा आग्रह  असतो    कारण   त्यामुळे      त्यांच्यातले  भावबंध   कायम   राहतात;  पण    जर   तुम्हाला  एकच मूल पाहिजे असेल तर तुम्ही इतर मुलांमधून निवडू शकता."     पण दीपाला गोबऱ्या गालांची  आणि मोठ्या डोळ्यांची  गोंडस शिल्पा    खूप   आवडली   होती. "आपण