१०. लेह-लडाख - अविस्मरणीय अनुभव भाग १

  • 12.6k
  • 1
  • 3.6k

सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ, मोनास्ट्रीज, गिर्यारोहकांचे नंदनवन, निसर्गाचे विविधांगी दर्शन अशी रेलचेल असणाऱ्या लेह-लडाखची भटकंती एकदा तरी अनुभवावी अशी प्रत्येक पर्यटनाची आवड असणाऱ्यांची इच्छा असतेच. खरंच आहे ते.. निसर्गाचे चमत्कार लेह-लडाख मध्ये पाहायला मिळतात. इथला निसर्गाला उपमा द्यायच्या म्हणजे कदाचित शब्द अपुरे पडतील. नेहमीच्या प्रवासापेक्षा खूप वेगळा असा हा प्रवास आहे. या प्रवासामध्ये हिमालयाच्या डोंगरांमध्ये अरुंद रस्त्यांवर केलेला हा प्रवास म्हणजे वेगळाच थरार आहे. आणि तुफान थंडी आणि विरळ होणारा ऑक्सिजन यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. येते प्रत्येक मिनिटाला काहीतरी वेगळ येथे अनुभवायला मिळते. या रस्त्यांच्या सभोवताली असलेलं निसर्गसौंदर्य म्हणजे देवाची अफलातून कारागिरी आहे असच वाटत राहत. मनमोहक, पण तेवढेच खतरनाक रस्ते इथे आहेत.