निर्भया - 16

(25)
  • 8.3k
  • 2
  • 4.4k

   निर्भया - १६    दीपाची मानसिक अवस्था  इतकी वाईट  झाली  होती  की  ती सोसायटीच्या  कार्यक्रमालाही  गेली  नाही. तिचं  डोकं  सुन्न   झालं  होतं. पंधरा वर्षांपूर्वीच्या-  आठवणी तिच्याभोवती फेर धरून विकट हास्य  करत होत्या. तिला बरं  वाटत नाही, हे पाहून सुशांतच्या आई-बाबांनीही कार्यक्रमाला जाण्याचा बेत रद्द केला. सासू- सासऱ्यांना कसंबसं  जेवायला  वाढून ती  बेडरूममध्ये जाऊन  झोपली. पण जुन्या   आठवणी  पाठ सोडत नव्हत्या.      पडल्या- पडल्या  तिला  झोप  लागली.  तिच्या मनातले  विचार  स्वप्नांमध्ये मूर्तरूप   घेऊ लागले. स्वप्नात ती जीव तोडून धावत होती. पण  दुस-याच क्षणी तिला स्वतःच्या  जागी  शिल्पा   दिसू  लागली. तिला   नराधमांनी   घेरलं   होतं आणि ती दीपाला जिवच्या आकांताने हाका मारत