गावदेवीचा उत्सव

  • 3.1k
  • 1
  • 1.3k

वर्षातून एकदा येणारा गावाकडचा गावदेवीचा उत्सव.नवी नवरी असलेली स्पृहा कल्पनेनेच हरखून गेली.तिच्या माहेरचं गाव असं आता राहिलं नव्हतं.पण देवेशच्या घरचं म्हणजे तिच्या सासरचं मूळ गाव गोव्याजवळच्या छोट्या निसर्गसंपन्न खेड्यात. त्याचे चुलतकाका आणि त्यांचं कुटुंब आजही तिथे आहे.काजू,सुपारी सांभाळत गोव्यात आपलं दुकान सांभाळत शेतीही करत आहेत.तसं गोवा म्हटलं की निसर्गसंपन्न भूमी,समुद्र,नारळी पोफळीची राया,काजूच्या बागा,जुनी मंदिरं हे चित्र समोर उभं राहतचं.दिवाळीनंतरच्या त्रिपुरीच्या चांदण्यात गावातला उत्सव होत असे. खेळे होत. भजनं कीर्तनं महाप्रसाद होत असे. किरीस्ताँव छाप ल्यायलेल्या आजूबाजूच्या गावांपेक्षा हिंदू वळणाचं आणि घरांचं हे छोटेखानी गाव आडही लक्षवेधी होतं.फोंड्याजवळचं मडकी गाव.नवदुर्गा मंदिर असलेलं.स्पृहाने उत्साहाने सगळी तयारी केली.तिच्या सासूबाईंनाही आश्चर्य वाटलं कारण स्पृहा