तिचा दोष इतकाच की ...

(20)
  • 4.3k
  • 1
  • 911

ध्यानीमनी नसतांना ,डोळ्यादेखत आपला माणूस कायमचा सोडून जातांना पाहण्याची दुर्दैवी वेळ सर्वावर आली होती , जवळ रहाणाऱ्या माधुरीच्या परिवाराला हे पहाणे टाळता आले नव्हते , परिवारावर मोठेच दुखः कोसळले होते , कमी वयात अशा प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ नम्रतावर आली ,, अशा प्रसंगात तिला सोबत करण्याची वेळ माधुरीवर आली होती. दुखः सहन करीत त्यातून मार्ग काढणे भाग होते रोजचे दिनक्रम प्रत्येकाला होतेच , आपपल्या वेळेप्रमाणे आलेला परतणार होता , नॉर्मल होण्यासाठी फार वेळ लागून चालणार नव्हते , आपले दुखः ,आपले प्रश्न आपणच सोडवायला पाहिजे आहे , हे व्यावहारिक वास्तव नम्रताने स्वीकारले ,तसे मनावरचे एक ओझे कमी झाल्याची भावना तिला होऊ लागली .