लाईफझोन (भाग -5)

  • 4.9k
  • 2.3k

        कातरवेळच्या रम्य संध्याकाळी मनात निर्माण झालेल्या वादळाने मला वेडावून घेतलं  . का कोण जाणे ? जीवन मरण ह्यातलं गूढ ,  दोन दिवसाआधी रस्त्याने जाताना  वाटेत आमची भेट झाली ती शेवटचीच .              नैराश्याच्या गर्देत मी गुरफटून गेले होते कळतं नव्हतं धाय मोकळून आज मी कुणाजवळ रडू ??    मी ज्या मनस्थितीतुन जात आहे त्याच मनस्थितीतुन सँडी , प्रद्युमन आणि डॅन जात असावे कदाचित .... पण ,    आज नैराश्याने मला खूप पोखरून घेतलं असं वाटतंय दुःख आणि क्षणिक वाटायला येणारा आनंद तो आनंद की दुःखावर सांत्वन  ?  माझा पाठलाग कायम करणार का ही संकट ? नाही