एक रात्र...

(21)
  • 6.5k
  • 2.2k

अंधारावर प्रेम करणारी रात्र, चकाकणारे दिवे, निर्मनुष्य रोड आणि काया... कुठे चालली माहिती नाही, का चालली माहिती नाही, कुणी अडवणारा नाही, कुणी विचारणारा नाही, तस ते शहर तीला अनोळखी न्हवते, जन्मापासून ती या शहरात वाढलेली. तरीही रात्रीचे २ वाजता अश्या निर्जन ठिकाणी एकट्या मुलीन येण म्हणजे दिड कीलोच्या मेंदू मध्ये हजारो टनचा प्रश्नचिन्हच... चालता चालता ती त्या पुलावर येऊन थांबली, जो तीला रोज स्वप्नात खुणावत होता. ती त्या पुलापर्यंत कशी पोहोचली हे तीलाही कळाल नाही. काही वेळाने तो आला, एखाद्या मुर्तीकाराने घडवलेली मुर्ती जशी निशब्द स्तब्ध उभी राहते तशी ती उभी होती, जणू संमोहितच. त्याने खांद्याला अडकवलेल्या झोळीत हात घातला