हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा - भाग १ हिमाचल प्रदेश हे उत्तर भारतातील एक पहाडी राज्य आहे. हिमाचल प्रदेश चा शाब्दिक अर्थ बर्फाचे पहाड असलेला प्रांत असा आहे. बर्फ नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो त्यामुळे पर्यटकांच आवडत ठिकाण म्हणून हिमाचल प्रदेश प्रसिद्ध आहे. हिमाचलच्या उत्तरेला जम्मू आणि काश्मीर, पश्चिमेला पंजाब, आग्नेयेला उत्तराखंड व दक्षिणेला हरियाणा ही राज्ये आहेत. हिमाचल प्रदेशाचे क्षेत्रफळ ५५,६७३ चौ.किमी आहे. लोकसंख्या ६८,५६,५०९ एवढी आहे. हिंदी व पहाडी ह्या येथील प्रमुख भाषा बोली आहेत. शिमला ही हिमाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हिमाचल प्रदेशाची साक्षरता ८३.७८ टक्के आहे. गहू, बटाटे, तांदूळ, आले ही येथील प्रमुख पिके आहेत. हे राज्य हिमालयाच्या कुशीत वसले असल्यामुळे येथे अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. कुलू, मनाली, सिमला, धरमशाला यांसारखी प्रसिद्ध पर्यटन स्थळे या राज्यात असल्यामुळे पर्यटनाच्या बाबतीत हे राज्य आघाडीवर आहे. इथे लाखोंच्या संखेने