करुणादेवी - 3

  • 5.6k
  • 3.5k

शिरीष करुणेची समजूत घालीत होता. परंतु तिचे अश्रु थांबत ना. ‘करुणे, किती रडशील! जाण्याशिवाय गत्यंतर नाही. पुढे मी तुला नेईन. सुखी करीन.’ ‘पुढे काय होईल, कोणास माहीत? मोठ्या शहरात मोह असतात. शिरीष, मी खेडवळ. मी तुला मग आवडणार नाही. मुख्य प्रधानाची बायको मी शोभणार नाही. माझ्यामुळे तुला कमीपणा येईल. मला न्यायची तुला लाज वाटेल.’