स्वराज्यसूर्य शिवराय - 14

(14)
  • 6.1k
  • 1
  • 2.4k

शाहिस्तेखानावरील विजय ही एक प्रचंड बळ देणारी घटना होती. स्वराज्यावर आलेले फार मोठे संकट शिवरायांनी अत्यंत चातुर्याने, धाडसाने, नियोजनाने, कुशलतेने सोडविले परंतु शाईस्तेखानाने आणि त्याच्या फौजेने स्वराज्याची आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि प्राण हानी फार मोठ्या प्रमाणात केली होती. आर्थिक हानी कशी भरून काढता येईल हा विचार शिवराय सातत्याने करीत होते. विचार करता करता अचानक त्यांच्या समोर औरंगजेबाच्या ताब्यात असलेल्या सुरत या शहराची आठवण झाली. सुरत म्हणजे अत्यंत श्रीमंत असे शहर. शिवरायांनी ठरविले की, स्वराज्याची झालेली आर्थिक हानी भरून काढण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे सुरतेवर छापा टाकायचा आणि त्या शहरातील व्यापारी, श्रीमंत लोक यांच्याकडून वसुली करून झालेले स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढायचे. ह्या छाप्यातून मिळणारी संपत्ती औरंगजेबाने विस्कटलेली स्वराज्याची घडी नीट बसविण्यासाठी कामी येणार होती.