करुणादेवी - 7

  • 5.9k
  • 2.1k

दुष्काळ संपला. देवाला करुणा आली. आकाश भरभरुन आले. पाऊस मुसळधार पडला. तहानेलेली पृथ्वी भरपूर पाणी पिऊ लागली. नद्या नाले भरले. वापी तडाग भरले. लोकांची हृदयेही आनंदाने भरली. राजा यशोधराने दुस-या देशांतून बैल वगैरे आणून गावागावांना मोफत बी-बीयाणे पुरविले. पृथ्वी हिरवी दिसू लागली. शेतकरी शेतात दिसू लागली. लवकर येणारे धान्य पेरले गेले. बाजरी, मकई बरीच पेरली गेली.