गंध दरवळला..

  • 3.8k
  • 900

तुळशीबागेचा भरगच्च रस्ता... भर गणेशोत्सवाच्या तोंडावर गर्दीने रस्ते फुलले होते...फुलबाग तर माणसांनी खचाखच भरुन वाहत होती.तो ती गर्दी ओलांडून पुढे आला आणि मंडईच्या चौकात येऊन उभा राहिला.त्याच्या हातात उदबत्तीचे पुडे होते... दहाला एक .. पंचवीसला तीन... घरच्या गणपतीसमोर सुगंध पसरावा...कुणी त्याच्याकडे लक्ष देईना... भर दुपारी उपाशीपोटी तो फिरत होता..समोर म्हातारी आजी दिसत होती.... घरी वाट पाहणारी... एवढे पन्नास पुडे विकले गेले तर शंभर रूपये मिळतील.दोन तीन दिवसाचा किराणा नेता येईल... पोटात दोन घास जातील...संध्याकाळ कलत आली... गर्दी वाढत होती पण त्याच्याकडे फारसं लक्ष जाईना.... कुणाचंच....त्याचा चेहरा आणखीनच कासावीस झाला... डोळ्यात नकळत पाणी जमा झालं... समोरच्या स्टाॅलवर विक्रीला माँडलेल्या गणपतीच्या मूर्तींकडे