तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग ११

(24)
  • 8.6k
  • 3
  • 3.5k

प्रसंग – ९ स्थळ.. केतनचे घर.. केतन सोफ्यावर पुस्तक वाचत बसलेला आहे. खरं तर नुसतच पुस्तक हातात आहे. तेवढ्यात अनु येते. अनुला बघुन केतन उठुन उभा रहातो.(मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.) अनु : आई…..sssssकेतन : अनु? आई घरी नाहीये… बाहेर गेली आहे..अनु : ओह.. कधी पर्यंत येतील? कालच्या त्या किचन रेसेपीज मधला एक पदार्थ बनवला होता मी.. केतन तिच्या हातातले भांड काढुन बाजुला ठेवतो, आणि तिचा हात हातात घेतो केतन : आई आणि तायडी बाहेर केळवणाला गेल्यात.. यायला खुप उशीर होइल…अनु : केतन प्लिज.. हात सोड.. मला जाऊ देत घरी…केतन : अजुन किती दिवस स्वतःला माझ्यापासुन दुर ठेवणार