१७. हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग ३

  • 6.8k
  • 3.1k

१७. हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग ३ २. मनाली- मनाली हिमाचल प्रदेशाच्या कुलू जिल्ह्यातील निसर्गसुंदर शहर. मनाली पर्यटकांच आवडत हील स्टेशन आहे. लोकसंख्या 2,254 (1981). हे सिमल्याच्या उत्तरेस सुमारे 250 कि.मी. समुद्रसपाटीपासून 1,798 मी. उंचीवर वसलेले आहे. हिमाचल हे राज्यच मुळी निसर्गाने अतिशय समृद्ध राज्य आहे. कोंदणात हिरा बसवावा तसे मनाली हे नितांतसुंदर पर्यटनस्थळ. हिमाचलमधील ही सर्वात सुपीक व्हॅली समजली जाते. अतिशय सुंदर असा हा प्रदेश आहे. पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणारा.. त्याचबरोबर, ‘ट्रेकर्स पॅराडाईझ’ म्हणून ओळखल्या जाणा-या मनालीहून १२ कि.मी. वरील कोठी हे निसर्गरम्य गाव म्हणजे रोहतांग पासमधील ब-याचशा ट्रेक्सचं सुरुवातीचं ठिकाण. ट्रेकिंग ची आवड असणाऱ्यांच अतिशय आवडत