करुणादेवी - 11

  • 5.4k
  • 1.5k

शिरीषने घरी येताच हेमाला ती तसबीर दाखविली व तो म्हणाला, ‘ही बघ माझी तसबीर!’ ‘कोठून आणलीस, शिरीष?’ तिने विचारले. ‘एका भिकारणीची चोरली, पळवून आणली. आज मी चोर झालो.’ ‘शिरीष, असे करु नये?’ ‘परंतु मला न विचारता माझे चित्र कोणी काढले? आणि ते का असे वा-यावर टांगून ठेवायचे? जणू फाशी दिलेला. आणले मी काढून.’