करुणादेवी - 13

  • 5.8k
  • 1
  • 1.4k

‘शिरीष, सासूबाई व मामंजी ह्यांच्या समाध्यांना फुले वहायला केव्हा जायचे ?’ हेमाने विचारले. ‘प्रेमानंदानेही बोलावले आहे. जन्मभूमीला विसरु नकोस, असा त्याचा संदेश आहे,’ करुणा म्हणाली. ‘करुणे, मी जननीलाही विसरलो व जन्मभूमीलाही विसरलो ! मी महान पातकी आहे !’ शिरीष दुःखाने म्हणाला. ‘परंतु करुणेची पुण्याई आपला उद्धार करील. करुणा का निराळी आहे? आपल्या तिघांच्या पापपुण्याचा जमाखर्च एक करु. चालेल ना, करुणे ?’ हेमा म्हणाली. ‘हो, चालेल. तिघांच्या जीवनाचे प्रवाह एकत्र मिळू देत. त्रिवेणीसंगम होऊ दे, सर्वात पवित्र संगम. शिरीष कधी जायचे घरी ?’