कळ्यामाळीकाका नेहमीप्रमाणे बागेत काम करत होते. ती सवयीप्रमाणे उठून गॅलरीत आली आणि छानसा आळस देता देता तिचं लक्ष काकांकडे गेलं. तिच्या बालपणापासून माळीकाका त्यांच्याकडे कामाला होते.ती अगदी छोटी असताना बागेतल्या हिरवळीवर रांगायची तेव्हापासून माळीकाका तिला आवडतात.धोतर नेसलेले,अंगात सदरा, कपाळी गंध आणि बुक्का,गळ्यात तुळशीची माळ.रोज घरात यायचे तेच बागेतली फुलं घेऊन फुलदाणीत ठेवायला.ही रांगता रांगता पायात आली की तिलाही उचलून घ्यायचे हातात. आजीला आवडायचं नाही पण आई बाबा कौतुकाने पहायचे.माळीकाका बागेला पाणी घालायचे, गवत कापायचे, झाडांना नीट कापून आकार द्यायचे, हिरवळीवर पडलेली वाळकी पानं काढून स्वच्छता करायचे. झाडावरची फुलं अलगद काढून परडीत ठेवायचे. आजी मात्र बागेत येऊन स्वतःच्या हाताने पूजेसाठी फुलं