कावळे - 1

(11)
  • 11.8k
  • 3
  • 6.1k

मला कावळा लहानपणी फार आवडे. त्याचा तो काळा कुळकुळीत रंग, त्याचा तो मोठा काऽ काऽ आवाज, त्याच्या पंखांचे फडफडणे, त्याच्या वाकुल्या-मला सारे आवडे. आईच्या कडेवर बसून मी त्याला कितीतरी वेळा पाहावयाचा. लहाणपणी, विशेषत: मला, जेवताना आई अंगणात घेऊन यायची. तिच्या हातात घास असायचा व भरवताना ती मला म्हणायची, “हा घे हां, हा काऊचा, हा चिऊचा, तो बघ काऊ. येरे येरे काऊ, माझा बाळ घास खाऊ.” आणि मग घास घ्यायचा. मी राजा. आईच्या कडेवर बसून असा एक एक घास मी खेळत खेळत, चिमण्या-कावळे बघत बघत घ्यायचा. मध्येच कावळा उडून जाई. “गेला काऊ. घे रे एवढा घास, घे हो.” असे आई म्हणायची. आजूबाजूस कावळा दिसल्याशिवाय मी जेवायचा नाही. मी जरा मोठा झाल्यावर त्याला भाकरी फेकायचा व तो धिटुकला ती घ्यायचा. एक दिवस तर मी अंगणात भाकर घेऊन बसलो होतो,