सरस्वती

  • 3.7k
  • 1
  • 2.6k

विवाह सोहळा सुरू होत होता. सनातनी पद्धतीने वत्सलेचा विवाह केशवरावांशी होत होता. सगळे पुरुष नातेवाईक जमले होते. सरस्वती ही होतीच घरची करवली म्हणून.विधींना सुरुवात करण्यापूर्वी केशवरावांचे वडील बंडोपंत, वत्सलेच्या वडिलांना घेवून थोडे मंडपाच्या बाहेर आले. सर्व जमलेल्या मंडळीत चर्चा सुरू झाली. तसही सरस्वतीच्या येण्याने कुजबुज झाली होतीच त्यात ही भर पडली.ब्रिटिशांच्या अंमलाखाली सनातनी आणि सुधारणावादी अशा दोन वर्गांचे अस्तित्व समाजात ठळकपणे दिसू लागले होते. बंडोपंत आणि त्यांचे कुटुंब हे सनातनी वळणाने जाणारे. हुंडा द्यायचा नसला तरी रूपाने बेतासबेत असलेल्या वत्सलेच्या रूपापोटी तरी तिच्या वडिलांनी काहीतरी वरदक्षिणा द्यावी असा आग्रह केशवरावांच्या वडिलांनी धरला.वत्सलेचे वडील चिंतेत पडले... अहो तुम्ही सुधारक समाज मंडळीत