कावळे - 7

  • 7.9k
  • 2
  • 2.7k

कावळ्याची सारी हकीकत ऐकून मी लज्जित झालो स्तंभित झालो. “सख्या गुरो, हा आणखी तुकडा ने. तूही खा. पाणी पी. मला समाधान होईल. तू मला दिव्य विचार दिलेस. मी कृतज्ञतेने हा तुकडा देतो, घे.” मी म्हणालो. माझ्या आग्रहास्तव त्याने तुकडा खाल्ला. तो पाणी प्याला. मी त्याला वंदन केले. गेला. कावळा उडला.