सुनयना

  • 3.7k
  • 2
  • 1.8k

सुनयना “सुनयना आज इन नजारोको तुम देखो और मै तुम्हे देखते हुए देखु “येसुदास गात होता अगदी तन्मयतेने ऑफिस समोरच्या टपरीमध्ये दुपारची जुनी गाणी लागली असावीत ते सुर कानावर पडताच अजिंक्यच्या ओठावर हसु रेंगाळले. हे गाणे त्याचे खुपच आवडते होते आणि आजकाल तर जास्तच आवडायला लागले होते ,त्याला कारणही तसेच होते .काही दिवसापूर्वी त्याला त्या “सुनयना” चे दर्शन झाले होते झाले होते असे की,एक दिवस ऑफिस संपल्यावर तो इमारतीतुन बाहेर पडला होता .समोर एक स्टेशनरीचे दुकान होते .तिथे त्याला काही ऑफिस स्टेशनरी आणि अन्य काही वैयक्तिक उपयोगाचे साहित्य घ्यायचे होते म्हणून तो तिथे गेला. संध्याकाळची वेळ होती दुकानात बर्यापैकी गर्दी