इश्क – (भाग ११)

(17)
  • 9.6k
  • 2
  • 3.9k

राधाचा निश्चय पक्का होता. कबिर काही मार्ग काढो नाही तर न काढो, तिला इथुन निघणं क्रमप्राप्त होतं. तिला आपल्या आयुष्याकढुन काय अपेक्षा आहेत हे स्पष्ट होते, आणि कुण्या कबिर नामक व्यक्तीसाठी, ज्याची ओळख फक्त काही दिवसांची होती, त्याच्यासाठी ती आपले स्वातंत्र्य पणाला लावण्यास कदापी तयार नव्हती. कबिरला सोडुन ती आपल्या खोलीत आली. सोफी-ऑन्टीचा जाताना निरोप घेता येणार नाही ह्याचं मात्र तिला राहुन राहुन वाईट वाटत होत. महीन्याभरातच त्यांचे आणि राधाचे खुप छान संबंध जुळले होते. “एका अर्थाने, झालं ते बरंच झालं, कदाचीत त्यांचा निरोप घेण जास्त अवघड झालं असतं. शेवटी इथे थोडं नं आपण कायमचं रहाणार होतो? ४ दिवसांनी जायचं,