ISHQ - 11 books and stories free download online pdf in Marathi

इश्क – (भाग ११)

राधाचा निश्चय पक्का होता. कबिर काही मार्ग काढो नाही तर न काढो, तिला इथुन निघणं क्रमप्राप्त होतं. तिला आपल्या आयुष्याकढुन काय अपेक्षा आहेत हे स्पष्ट होते, आणि कुण्या कबिर नामक व्यक्तीसाठी, ज्याची ओळख फक्त काही दिवसांची होती, त्याच्यासाठी ती आपले स्वातंत्र्य पणाला लावण्यास कदापी तयार नव्हती.

कबिरला सोडुन ती आपल्या खोलीत आली. सोफी-ऑन्टीचा जाताना निरोप घेता येणार नाही ह्याचं मात्र तिला राहुन राहुन वाईट वाटत होत. महीन्याभरातच त्यांचे आणि राधाचे खुप छान संबंध जुळले होते.

“एका अर्थाने, झालं ते बरंच झालं, कदाचीत त्यांचा निरोप घेण जास्त अवघड झालं असतं. शेवटी इथे थोडं नं आपण कायमचं रहाणार होतो? ४ दिवसांनी जायचं, ते आज…”, बॅग भरताना राधाने विचार केला. तिने खोलीतला दिवा बंद करुन टाकला आणि अंधारात ती बसुन राहीली.

कबिरबद्दल तिच्या मनात काय होते ते तिलाच सांगता येत नव्हते. दोन दिवसांच्या ओळखीतच कबिर आपल्याला इतका का जवळचा वाटतोय हा विचार तिला सतावत होता. दोन दिवसांच्या ओळखीवरच त्याने तरी आपल्याला “आय लव्ह यु..” म्हणायची काय गरज होती? जसं त्याची नजर काहीही न बोलुनही खुप काही बोलुन जाते, कदाचीत आपले डोळेही आपल्याला तसाच तर दगा देत नसतील ना? असाही एक विचार तिच्या मनात येऊन गेला.

खुप विचार करुनही उत्तर सापडेना तसा तिने कबिरचा विचार मनातुन काढुन टाकला..

दीड तास उलटुन गेल्यावर राधा हळुच खोलीचं दार उघडुन बाहेर आली. दुरवर लॉनवर पेटवलेली शेकोटी विझलेली होती, परंतु गरम निखार्‍यांतुन धुर अजुनही निघत होता. कबिर खुर्चीतच डोकं मागे रेलुन बसला होता. काही मिनीटं तेथेच थांबुन कबिरला झोप लागली असल्याची तिने खात्री केली आणि मग पॅसेजमधल्या फोनवरुन तिने कॅबला फोन केला.

तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि कसलाही आवाज न करता बॅग घेऊन राधा बंगल्याच्या बाहेर पडली. पुन्हा एक नविन सुरुवात, नविन लोकं, नविन जागा.. कदाचीत ह्याच आयुष्याची आपण आस धरली होती.. कदाचीत हेच ते आयुष्य ज्यासाठी आपण सुखनैव जीवन मागे सोडुन बाहेर पडलो होतो.

राधा कॅबने स्टेशनवर पोहोचली. अर्थात स्टेशनवर तिचं काहीच काम नव्हते, पण तिला खात्री होती की कबिरला ती निघुन गेली हे कळल तर कसंही करुन तो तिचा मार्ग काढायचा प्रयत्न करेल आणि कदाचीत स्टेशनपर्यंत पोहोचेल.. शेवटी काहीही झालं तरी गुन्हेगारी कथांचा लेखंक ना तो…

कबिरचा विचार मनात येताच राधाला आपसुकच हसु आलं. कबिरशी झालेली भेट.. त्याला चुकीचं समजुन त्याच्याच डोळ्यात स्प्रे मारुन तेथुन काढलेला पळ.. दुसर्‍या दिवशी सकाळी हॉटेलमध्ये त्याच्याशी झालेली भेट, सगळं तिच्या मनात एका क्षणात फ्लॅश होऊन गेलं…

कॅब निघुन गेली ह्याची खात्री पटताच राधाने स्टेशनवरची दुसरी रिक्षा पकडली आणि बिचकडे मोर्चा वळवला.

इतक्या रात्री बीचवर जायला सांगणारी, आणि ते पण एकटी मुलगी बघुन रिक्षावाल्याने तिला आपादमस्तक न्ह्याहाळलं, पण तिला त्याची पर्वा नव्हती. व्यवहारी जगताशी कदाचीत तिचा हा शेवटचा संबंध होता. सर्व पाश, सर्व गुलामगिरी, सर्व रितीभाती मागे सोडुन ती आपलं आयुष्य हिप्पी जिवनशैलीला समर्पीत करत होती.

रिक्षावाल्याला पैसे चुकते करुन ती बीचवर आली. अंधारात समुद्राच्या लाटांचा आवाज अधीकच घनगंभीर भासत होता. चांदण्याच्या प्रकाशात खडकांवर आदळणार्‍या समुद्राच्या फेसाळ लाटा अधीकच चंदेरी दिसत होत्या. समुद्राची रेती रात्रीच्या थंडीत अजुनच गार पडली होती. गार वार्‍याचा एक झोत राधाला स्पर्शुन गेला तशी राधाने ओढणी अंगावर पांघरली आणि ती वाळुतुन आपली बॅग ओढत ओढत चालत राहीली.

साधारण किलोमीटर भर चालल्यावर तिला हसण्या-खिदळण्याचे आवाज ऐकु येऊ लागले. लांबवर अजुनही शेकोटी पेटलेली होती. शेकोटीच्या प्रकाशात २-४ आकृत्या नृत्य करत होत्या.

हेच ते स्वातंत्र्य जे राधाला अपेक्षीत होते. रात्रीच्या दोन वाजता सुध्दा सो-कॉल्ड सभ्य वर्तनाला अनुसरुन खोलीत गपचुप झोपुन रहाण्यापेक्षा मनाला वाटेल तसे, वाटेल ते करण्यातला आनंद काही औरच असतो हे राधाला पुन्हा एकदा जाणवले.

राधाने आपल्या चालण्याचा वेग वाढवला आणि ती झपझप पावलं टाकत त्या शेकोटीपाशी जावुन पोहोचली.


राधाला पहाताच त्या ग्रुपमधील एक मुलगी पट्कन उठुन तिच्याजवळ आली, आणि राधाच्या हातातल्या बॅगेकडे बघत म्हणाली…

“फायनली?”
“येस.. फायनली…”, राधा मिस्कील हसत म्हणाली
“बरं झालं तु आलीस, नाही तर आम्हाला मिस केलं असतंस…”
“का?”
“आजची गोव्यातली शेवटची रात्र, दोन-चार तासात आपण निघतोय….”
“वॉव्व.. कुठे??”
“ओम बिच.. गोकर्ण… चल तुझी ओळख करुन देते..” असं म्हणुन ती मुलगी राधाला घेऊन ग्रुपमध्ये गेली.

राधाला आलेली पहाताच सगळ्यांनी त्यांच नाच-गाण थांबवलं..

“गाईज.. धिस इज राधा.. आजपासुन आपल्याबरोबर असेल.. राधा.. धिस इज चार्ली..” थोड्या उंच खडकावर बसलेल्या एका खुरट्या दाढीवाल्या मुलाकडे बोट दाखवत ती मुलगी म्हणाली.. “धिस इज जॉन… रिटा.. रॉकी, शॉन, मेहेक…”

एक एक करत सगळ्यांची ओळख करुन दिल्यावर ती म्हणाली.. “अ‍ॅन्ड अ‍ॅज यु नो.. आय एम शिना…”

मग ती परत सगळ्यांना म्हणाली, “राधा मला लास्ट विक परेराच्या पार्टीमध्ये भेटली होती.. मस्त आहे एकदम.. मला खुप आवडली.. आपल्या ग्रुपमध्ये पण मस्त मिक्स होईल.. वेलकम राधा…”

सगळ्यांनी टाळ्या, गिटार, बेंजो.. जे हाताला लागेल ते वाजवुन राधाचं स्वागत केलं. राधाने कमरेत वाकुन सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला आणि ती कोपर्‍यात शिना जेथे बसली होती तिच्या जवळ जाऊन बसली.

थोड्यावेळाने परत नृत्य सुरु झालं..

“सो हु इज डुईंग द डान्स टुनाईट?”, चार्ली मध्येच म्हणाला…
“राधा नविन आहे.. तिलाच करु दे की..”, दुसरा एकजण म्हणाला…
“नको.. ती नविन आहे.. तिला जरा सेटल तरी होऊ देत, रिटा.. यु अप फ़ॉर धिस?”, शिनाने विचारले…
“बाय ऑल मिन्स..”, रिटा खिदळत म्हणाली.. त्याबरोबर इतरांनीही शिट्या वाजवुन तिला प्रोत्साहन दिले…

“हे.. आय एम ओके विथ डान्स..”, राधा हळुच शिनाला म्हणाली..
“नो यु वोन्ट बी.., तुला माहीत नाहीए हा प्रकार अजुन.. जस्ट वेट अ‍ॅन्ड सी…”


रस्त्यावर थोड्या अंतरावर एक ट्रक थांबल्याचा आवाज आला, आणि थोड्यावेळाने एक अगडबंब माणुस झोकांड्या खात त्यांच्या ग्रुपमध्ये दाखल झाला…

“हिया दोस्त.. कैसा है?”, चार्लीने उठुन त्याला अलिंगन दिले…
“कितने लोग?”, तो गिड्या माणुस म्हणाला…
“बस हमेशाके… दस-बारा..”, चार्ली ग्रुपकडे बोट दाखवत म्हणाले…
“पाच हजार लगेगा… चेक-पोस्ट है बिचमै..”
“क्या यार.. अब इतना पैसा होता तो खुदकी गाडी न खरीदते..”, स्वतःच्या दाढीवरुन हात फिरवत चार्ली म्हणाला… “बैठ.. दारु पी.. तुझ्यासाठी आज डान्स आहे..”
“रिअली??”, डान्सचं नाव काढताच त्या गिड्याचे डोळे चमकले..पोटावरुन खाली सरकलेली आपली अर्धी चड्डी सावरत तो लडखडत शेकोटीच्या शेजारी येऊन बसला.. कुणीतरी त्याला गोवा-स्पेशल फेणी आणुन दिली..


राधाला ह्या ‘डान्स’ प्रकाराचे फारच अप्रुप होते, जेंव्हापासुन ती ह्या ग्रुप मध्ये जॉईन झाली होती, तेंव्हापासुन प्रत्येकजणच ह्याबद्दल बोलत होता. काहीतरी भारी प्रकार असला पाहीजे ह्या विचाराने राधा वाट बघत होती. शेवटी थोड्या वेळाने रिटा रंगीत झिरमीळ्या लावलेला शॉर्ट ड्रेस घालुन टेंन्ट मधुन बाहेर आली आणि तिने शेकोटीभोवती फेर धरुन नाचायला सुरुवात केली.

२-३ मिनीटं झाल्यावर तिने अंगातले जॅकेट काढुन त्या गिड्याच्या दिशेने भिरकावले.. तसा ग्रुपमधुन टाळ्यांचा कडकडाट झाला…

“गो फॉर इट रिटा.. यु आर द मॅन…”
“उउह्ह.. कान्ट वेट… डु इट फ़ास्ट…”

शिनाने हसत हसत राधाकडे बघीतलं.. “कळलं?”
“नाही! काय झालं..”, राधा गोंधळुन म्हणाली

“ईट्स अ स्ट्रिप्टीज स्ट्युपीड..”, शिना म्हणाली.. “रिटा विल सुन बी डांन्सींग नेकेड..”
“व्हॉट???”, जोरदार शॉक बसल्यासारखी राधा म्हणाली.. “पण का?”

“कारण आपल्याला फुकट कोण प्रवास करु देणार.. आय टोल्ड यु ना.. आपण गोकर्णला चाललोय.. त्याच्या ट्रकमधुन..”, शिना त्या ट्रकवाल्याकडे बोट दाखवत म्हणाली..
“मग?”
“मग.. त्यासाठी हे…”, शिना रिटाकडे बोट दाखवत म्हणाली.. रिटा एव्हाना अर्धनग्न झाली होती, पण तिला कश्याचीही तमा नव्हती.. ती आपल्याच तालावर नृत्य करण्यात मग्न होती..
“हे बघ राधा.. दॅट्स द वे इट इज.. अ‍ॅन्ड इट्स फन.. इथे कुणाला कश्याची लाज नाही.. वु आर नॉट रिच अ‍ॅन्ड फेमस.. तो ट्रकवाला खुश.. आपण खुश.. आपलं काम झाल्याशी मतलब..”

“शिना.. माझ्याकडे आहेत पैसे थोडे.. इफ़ यु वॉन्ट..”, राधा आपली पर्स काढत म्हणाली..
“किती आहेत?”
“शेवटचे ७-८ हजार उरले असतील..”

इतके पैसे ऐकल्यावर शिनाचे डोळे विस्फारल्यासारखे झाले.. पण मग ती म्हणाली.. “श्शsss.. राहु देत आत्ता तुझ्याकडेच, आत्तापुरती तर सोय झालीय.. पण हे बघ.. कुणाला बोलु नकोस तुझ्याकडे इतके पैसे आहेत ते.. ओके?” अत्यंत हळु आवाजात ती म्हणाली..
“हम्म.. ओके…”, राधा रिटाकडे बघत म्हणाली जिने एव्हाना अंगावरचा एकमेव कपडा काढुन टाकला होता..


सामानाची सगळी बांधाबांध करुन, ट्रक मध्ये टाकुन निघेपर्यंत पुर्वेकडे फटफटायला लागलं होतं. सगळेजण ट्रकच्या मागच्या बाजुला बसले जेथे आधीच कसल्या-कसल्या सामानाची खोकी भरली होती.

“बॉर्डर-पोस्टच्या आधी मी सांगेन तेंव्हा कोपर्‍यात ती ताडपत्री अंगार घेऊन ५-१० मिनीटं लपुन रहा…”, ट्रक चालु करताना तो गिड्या माणुस चार्लीला म्हणाला..
“क्यो बे.. तु तर म्हणला सगळे पोलिस ओळखीचे आहेत तुझ्या?”, चार्ली
“अरे हो.. पण कधी कधी साहेब लोकं पण असतात..”, ट्रकवाल्याने ट्रक गेअरमध्ये टाकला तसा लोकांनी गिटार, बेंजो बाहेर काढले आणि गाणी सुरु केली, तर दुसर्‍या कोपर्‍यात रिटा आणि जॉन भल्या पहाटे स्मुचींग मध्ये मग्न झाले…

ट्रक हायवेवरुन वेगाने धावत होता.. कोवळ्या उन्हाची किरणं अंगाला सुखावत होती. राधा आपले दोन्ही हात फैलावुन वेगाने वहाणारा वारा अंगावर झेलत होती. क्षणाक्षणाला ती स्वतःला अधीकाधीक स्वैर.. हलकं, मुक्त अनुभवत होती.

“सो टेल मी मोअर अबाऊट यु..”, चार्ली राधाजवळ येऊन म्हणाला….
“आय एम नोबडी…”, ट्रकच्या तो मोठा आवाजाच्या वर ओरडुन राधा म्हणाली..
“वा.. लवकर शिकलीस की…”, चार्ली हसत म्हणाला.. “दॅट्स द फ़न ऑफ़ बिईंग हिप्पी.. वुई आर नोबडी..”


तासभराच्या प्रवासानंतर ट्रकचा वेग थोडा हळु झाला. ड्रायव्हरच्या केबीनला लागुन असलेल्या एका सरकते-दार-वजा-खिडकीतुन तो ड्रायव्हर म्हणाला.. “चेक-पोस्ट ५ मिनीटं…” आणि त्याने ती खिडकी परत लावुन टाकली.

सगळ्यांनी आपले सामान एका कोपर्‍यात गोळा केले आणि अगदी एकमेकांना चिकटुन ट्रकच्या एका कोपर्‍यात अंगावरुन ती ताडपत्री ओढुन बसुन राहीले. ग्रुपमधल्या त्या तरुणांचा स्पर्श राधाच्या अंगावर शहारे आणत होता. कित्तेक वर्षांनी परपुरुषांच्या इतक्या जवळ राधा होती. तिने नजरेच्या कोपर्‍यातुन मागे पाहीले तेंव्हा चार्ली तिच्याकडेच बघत होता.

राधा स्वतःशीच हसत म्हणाली.. “नॉट अगेन…”

काही वेळातच ब्रेक लावत ट्रक थांबला..

“सलाम साब..”, ट्रकवाला…”आज आप कैसे क्या पोस्ट पे..”
“क्या है पिछे…”, पलिकडुन जरबीचा आवाज आला..
“हमेशा का.. हम लोग तो बस वही…”
“ए जारे.. बघ काय आहे मागे…”, तो साहेब दुसर्‍यावर खेकसला, तसा एक जण पळत पळत आला आणि ट्रकचं मागचं दार उघडुन ट्रकमध्ये शिरला..

कदाचीत बाकीच्यांना ह्याची सवय असावी, मात्र राधासाठी हे नविन होतं. टेंन्शनमुळे राधाचं हृदय धडधडत होतं.. नकळतपणे तिचे हात-पाय थरथरत होते. चार्लीने त्याचा हात राधाच्या खांद्यावर ठेवला आणि तिला शांत रहायची खुण केली. राधाला पहील्यांदा जाणिव झाली की ती ह्या सर्वांपेक्षा कित्ती वेगळी भासत होती. तिचे कपडे, तिची बॅग.. कुठल्याही रितीने ती हिप्पी वगैरे वाटतच नव्हती. नाहक पोलिसांना संशय आला असता आणि तिची ओळख उघड झाली असती तर मोठ्ठी.. पंचाईत होती..

दोन-तिन मिनीटं उचकाउचकी करुन ट्रकमध्ये चढलेला तो पोलिस निघुन गेला..

कागदपत्र चेक करुन झाल्यावर, ट्रकवाल्याने ट्रक चालु गेला आणि बॉर्डर क्रॉस करुन ते नविन राज्यात शिरले…

“सब ठिक है..”, थोड्या वेळाने पुन्हा ती खिडकी उघडुन ट्रकवाला म्हणाला तसे सगळ्यांनी ती ताडपत्री फेकुन दिली आणि एकच जल्लोष केला. आणि ह्या सगळ्यांत पुढे होती ती राधा.. जणु नविन आयुष्य मिळाल्याचाच तिला आनंद होता.

आनंदाच्या भरात तिने सर्वांना कडकडुन मिठ्या मारल्या. चार्लीला मिठी मारुन ती बाजुला होऊ लागली, पण चार्लीने तिला घट्ट पकडले होते, राधा काही बोलायच्या आधीच त्याने आपले ओठ राधाच्या ओठांवर टेकवले..

[क्रमशः]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED