ISHQ - 1 books and stories free download online pdf in Marathi

इश्क – (भाग १)

कोरेगाव पार्कातल्या क्रॉसवर्डच्या बाहेर ‘मिडनाईट-ब्लॅक’ रंगातली फोर्ड-ईको-स्पोर्ट गाडी येऊन थांबली. दार उघडुन एक साधारण तिशीच्या आसपासचा एक युवक उतरला. गाडीच्या रंगाशीच सार्धम्य सांगणारा काळा कुळकुळीत सॅटीनचा शर्ट, ग्रे रंगाचं स्पोर्ट्स जॅकेट, पायात क्रोकोडाईल शुज, बारीक फ्रेमचा चंदेरी चष्मा आणि जेल लावुन मागे वळवलेले केसं. दाराशीच उभ्या असलेल्या बॉयला व्हॅलेसाठी गाडीची किल्ली देऊन तो क्रॉसवर्डमधील एका कोपर्‍याकडे वळला.

कोपर्‍यात जमलेली ८-१०च लोकं बघुन त्या तरूणाच्या चेहर्‍यावरील हास्य किंचीत मावळले.
त्याला आलेले बघताच गळ्यात मोठ्ठालं ओळखपत्र, कानाला ब्ल्यु-टूथ हेड्सेट लावून वावरणारा संयोजक टाईप्स एक युवक धावतच दाराकडे आला.

“वेलकम कबीर सर.. प्लिज वेलकम..”, तो संयोजक त्या तरुणाशी हातमिळवणी करत म्हणाला.
“जित.. अरे काय? इतकीच लोकं?”, काहीश्या नाराजीच्या स्वरात कबीर म्हणाला

कबीर, एक नविनच नावारुपाला आलेला लेखक. वर्षभरातच प्रकाशीत झालेली त्याची पहीली दोन पुस्तंक सुपर-हिट ठरली होती. गुन्हेगारी कथांमधील नविन उगवता तारा म्हणुन मेहतांचा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्याने पटकावला होता. पहीले बॅंक-रॉबरी आणि दुसरे किडनॅपींगवर बेतलेली त्याची दोन्ही पुस्तकं हातोहात खपली होती. अनेकांनी ती पुस्तकं एकाच बैठकीत वाचुन काढली होती. शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणुन धरणार्‍या त्याच्या कथा उत्सुकतेचा विषय ठरल्या होत्या. त्यामानाने त्याचे तिसरे पुस्तक म्हणावे तसे प्रसिध्द होऊ शकले नाही. आणि आज कबीरचे चौथे पुस्तक प्रकाशीत होत होते.

परंतु प्रकाशनासाठी जमलेली जेमतेम ८-१० लोकं पाहून कबीर काहीसा निराशच झाला होता.

“जित.. इतकीच लोकं?”, कबीर
“आय एम सॉरी सर.. अ‍ॅड्व्हरटाईज तर व्यवस्थीत केले होते पण… येतील सर.. अजुन येतील लोकं..”, जित उसने अवसान आणून म्हणाला
“एनीबडी फ्रॉम मिडीय़ा?”, कबीर
“नो सर..”, खाली मान घालून जित पुटपुटला..

“ओके! व्हेअर ईज रोहन?”, कबीरने विचारलं.
“येतोय सर तो, सेकंड फ्लोअर-वर आहे, मी इन्फॉर्म केलंय त्यांना तुम्ही आला आहात म्हणुन..”, जित म्हणाला
“वेल देन.. शुड वुई प्रोसीड?”, कबीर जॅकेटची बटणं ठिक करत म्हणाला..

“वन सेकंद सर..”, असं म्हणुन जितने आपला फोन लावला… आणि म्हणाला.. “कबीर इज मेकींग एन्ट्री, स्पॉटलाईट अ‍ॅन्ड क्लॅपींग्ज प्लिज…”

दोन सेकंद थांबुन जितने कबीरला चलण्याची खुण केली. त्याचबरोबर एक मोठ्ठा स्पॉटलाईट कबीरवर येऊन स्थिरावला. पाठोपाठ स्टेजवरच्या निळ्या साडीतील एका तरूणीने केलेली अनांन्समेट आणि काही मोजक्या टाळ्यांच्या गजरात कबीर स्टेजवर चढला.

समोरच्या प्रेक्षकांत फारसं कोणी उत्साही दिसत नव्हते. पहील्या रांगेत तर बहुदा दोन चार रिकामे-पेन्शनरच येऊन बसले होते. त्यांना बघुन कबीरचे धाबे दणाणलेच. मागच्या प्रकाशनाच्या वेळी अश्याच एका वयस्कर माणसाने कबीरच्या पुस्तकातील अनावश्यक अश्लीलतेबद्दल चार खडे बोल सुनावले होते. आणि ह्यावेळी त्यावरुन किंचीतही बोध न घेता कबीरने ह्याही पुस्तकात नेहमीचे गरम प्रसंग घुसडले होतेच. कपाळावर मोठ्ठ कुंकु लावलेली एक स्त्री, दोन तिशीच्या आसपासचे तरुण आणि ५-६ कॉलेज युवक-युवतींचा ग्रुप.. बस्स…

“थॅंक्यु माय फ्रेंड्स…”, कबीरने माईकचा ताबा घेतला…”मला माहीती आहे, मला थोडा उशीरच झाला यायला.. त्याबद्दल मनापासुन दिलगीर आहे. मागच्या माझ्या तिन पुस्तकांना जो तुम्ही भरभरुन प्रतिसाद दिलात तसाच ह्या नव्या-कोर्‍या चौथ्या पुस्तकाला मिळेल अशी मी आशा बाळगतो. माझे हे चौथे पुस्तक ‘रोड-ट्रीप’ वर आधारीत आहे. एक कपल आपल्या अ‍ॅनीव्हर्सरीनिमीत्त ट्रीपला निघते आणि मग वाटेत काही घटना घडतात. मर्डर, किडनॅपींग, रोमॅन्स सर्व काही ह्या पुस्तकात आहेच…”

कबीर मुक्तपणे आपल्या पुस्तकाची तारीफ करत होता इतक्यात त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला.

कबीरने एस.एम.एस उघडला, रोहनचाच होता…

“कबीर.. फार पाल्हाळ लावू नकोस, जमली आहेत ती पण लोकं जातील.. पट्कन उरकुन वरती ये, मेहता साहेब तुझी वाट बघत आहेत…”

कबीरने वरती बघीतले, दुसर्‍या मजल्यावरच्या व्हरांड्यात गुटगुटीत, जुन्या काळच्या अजय-देवगणसारखी हेअर-स्टाईल असलेला गोरा-गोमटा रोहन उभा होता. रोहन.. म्हणाल तर कबीरचा जिवाभावाचा मित्र, म्हणाल तर कबीरचा मॅनेजर. त्याचे पब्लीकेशन्स, त्याच्या मिटींज्स, मिडीआ-कनेश्कन्स सगळं तो एकहाती सांभाळायचा.

त्याने कबीरला पटकन वरती यायची खुण केली आणि तो निघुन गेला.

“फ्रेंड्स, फक्त आजच्या दिवसापुरती ह्या पुस्तकावर ३०% डिस्काऊंट आहे, शिवाय.. मी अर्धा तास इथेच आहे, जे कोणी पुस्तक विकत घेतील त्यांना माझी साईन्ड कॉपी मिळेल ह्याची व्यवस्था आहे.. सो गाईज.. हिअर वुई गो…”

निळ्या साडीतील त्या दुसर्‍या संयोजक युवतीने मरुन-रंगाच्या वेस्टनमध्ये गुंडाळलेले पुस्तक कबीरच्या हातात दिले. कबीरने काळजीपुर्वक वेस्टन उघडले आणि आपले पुस्तक उंच धरले.

घेतलेल्या पैश्याला जागण्यासाठी संयोजक मंडळींनी जोरदार टाळ्या वाजवल्या, बाकी प्रेक्षकांमधुन काही मोजके सन्माननीय अपवाद वगळता फारसा कोणी उत्साह दाखवला नाही.

प्रकाशन संपवुन कबीर कोपर्‍यातील टेबलावर जाऊन बसला.
जित टेबलापाशी येऊन कबीरच्या कानाशी म्हणाला, “सर बुक-रिडींग करणार होतात ना? आय मीन पुस्तकातील काही मोजकी पानं तुम्ही वाचणार असं रोहनने कळवलं होतं.. तसं सांगीतलंय आपण..”

“लुक अराऊंड जित.. कुणाला इंटरेस्ट नाहीये… अर्धी लोकं उठुन गेली सुध्दा.. लेट्स कॅन्सल इट..”, कबीर म्हणाला
“ओके सर.. “, असं म्हणुन जित तेथुन निघुन गेला

अख्या गर्दीतील (!) फक्त दोन तरुणींना एक पुस्तक खरेदी करताना कबीरने पाहीले. त्या दोघीही स्वताच्या गप्पांमध्येच मग्न होत्या. बोलत बोलतच त्यांनी पुस्तक कबीरच्या टेबलावर ठेवले. कबीरने काही बोलण्यासाठी तोंड उघडले पण त्यांचे त्याच्याकडे लक्षच नव्हते.
कबीरने गुमान सही ठोकली, तसे ते पुस्तक घेऊन दोघी निघुन गेल्या.

कबीरने मोबाईल काढुन रोहनला फोन लावला.

“हॅलो.. रोहन.. अरे काय हे.. कसला थंडा रिस्पॉन्स… फक्त एकच पुस्तक विकलं गेलं..”, कबीर
“ते सोड.. तु वरती ये आधी.. मेहता सर थांबलेत..”, रोहन

“अरे पण.. मी सांगीतलं होतं ना त्यांना, त्यांची ऑफर मी आत्ता घेऊ शकत नाही म्हणुन…”, कबीर..
“हे बघ कबीर.. चिडू नकोस, पण आपलं तिसरं पुस्तक फारसं चाललं नाही.. आणि चौथ्याकडुनही मला फारश्या आशा नाहीत..”, रोहन

“अरे पण का? पहीली दोन पुस्तक किती मस्त प्रॉफीट देऊन गेली..”
“का? अरे एका तिसर्‍या माणसाच्या नजरेतुन तु तुझं पुस्तक वाचं. पुर्ण टाईप-कास्ट झाला आहेस तु. तेच खुन, त्याच मारामार्‍या, संधीसाधू बाई, माफीया, एखादा गरीब बेचारा परीस्थीती-का-मारा क्लर्क/मॅनेजर, प्रेडीक्टेबल झालंय अरे.. हे पुस्तक नाही गेलं विकलं तर तुला माहीती आहे का, आपल्याला केवढा मोठ्ठा लॉस होणारे..??”

“हो.. पण ते नंतर बघु ना, आत्ता त्या मेहताला घालवून दे…”
“हे बघ कबीर.. अर्धा तास झाला, त्यांच्यासारखा मोठ्ठा माणुस तुझी वाट बघत थांबलाय, निदान त्याची कदर म्हणुन तरी तु भेट.”

“पण यार, मला लव्ह-स्टोरी लिहीण्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये.. माझा जॉनरच नाहीये तो..”
“हे सगळं आपण समोरा-समोर बसुन नाही का बोलु शकत?.. तु वरती ये आधी..” असं म्हणुन रोहनने फोन बंद केला.

एव्हाना समोरची गर्दी पांगली होती. संयोजकांनीही फारसा पेशन्स नं दाखवता आवरा-आवरीला सुरुवात केली होती.

कबीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो क्रॉसवर्डच्या दुसर्‍या मजल्यावर गेला.


समोरच्याच सोफ्यावर साधारणपणे साठीच्या आसपासचे, चंदेरी केस असलेले एक गृहस्थ बसले होते. रोहन त्यांच्याच शेजारी बसला होता.

कबीरला येताना पहाताच ते गृहस्थ, मेहता, उठुन उभे राहीले..

“वेलकम यंग मॅन.. वेलकम.. ग्रिटींज्स फ्रॉम मेहना-एन-मेहता पब्लीकेश्नस ऑन युअर न्यु बुक..”
“थॅक्स अ लॉट सर…”, कबीर त्यांच्याशी हात मिळवत म्हणाला.. “प्लिज बसा ना सर.. “

दोघंही सोफ्यावर बसले…

“कॉफी?”, रोहनने विचारलं…
“नो.. थॅंक्स रोहन.. बसं..”, कबीर म्हणाला, “बोला मेहता सर, काय काम काढलंत?”

“काम वेगळं काहीच नाही”, कोटाची बटणं काढुन रिलॅक्स होत मेहता म्हणाले, “तेच, जे मागे आपण बोललो होतो…” असं म्हणुन त्यांनी कोटाच्या खिश्यातुन एक पांढरे एन्व्हलोप काढुन कबीरला दिले

“काय आहे हे..?”, कबीरने प्रश्नार्थक नजरेने मेहतांना विचारले.
“सि इट युअरसेल्फ..”, मेहता

कबीरने ते पाकीट उघडले, आतमध्ये त्याचं नाव घातलेला एक लाख रुपायाचा चेक होता.

“अ‍ॅडव्हॅन्स आहे, बाकीच्या टर्म्स मी रोहनशी बोललो आहे.. तो सांगेल सगळं…”

“पण सर, लव्ह-स्टोरी.. मला नाही जमायची.. आणि त्यात माझी पर्सनल लाईफ..”

“हो.. मला रोहनने सांगीतलं सगळं.. पण मला वाटतं, तुम्ही नक्की लिहु शकाल. तुमची लेखन शैली मला खुप आवडली. मला वाटतं तुम्हाला सुध्दा एका हिटची गरज आहे…”

“मी.. मी थोडं विचार करुन सांगतो मेहता सर..”, कबीर म्हणाला
“मला आत्ता कमीटमेंट हवीय कबीर. मी खुप दिवस थांबलो. येस… ऑर नो…”, मेहता निर्वाणीच्या सुरात म्हणाले..

“टेक ए ब्रेक कबीर.. कुठल्या तरी दुसर्‍या गावी जा, जिथे तु फक्त तु असशील, सगळ्यांपासुन दुर… तुझ्या इथल्या पर्सनल प्रॉब्लेम्सपासुन दुर.. कदाचीत तुझी लव्ह-स्टोरी तुला तिकडे सापडेल.. मेहता इज रेडी टु स्पॉन्सर युअर ट्रीप”, रोहन म्हणाला

“ओके हिअर इज अ डिल..”, कबीर म्हणाला.. “आय विल गिव्ह-इट-अ-ट्राय… से ३ आठवडे, पण त्यामध्ये काहीच कंस्ट्रक्टीव्ह नाही झालं तर वुई-विल कॅन्सल धिस डिल.. आणि मी हा चेक रिटर्न करेन, एक्स्पेट द टुर एक्स्पेन्सेस.. मेहता विल बेअर दोज.. ओके?”,

“डील..”, काही क्षण विचार करुन मेहता म्हणाले

“ग्रेट देन… बुक मी ए व्हिला इन माथेरान.. पुर्ण शांतता आहे तेथे..”, कबीर म्हणाला..

“माथेरान? अरे तुला लव्ह-स्टोरी लिहायची आहे, मेडीटेशनवर बुक नाही..”, हसत हसत मेहता म्हणाले, “माथेरान किती अंधारलेले, बंद-बंद गाव आहे.. यु निड टु गो टु सम लाईव्हली प्लेस.. कलरफुल.. फुल्ल ऑफ युथ प्लेस.. यु आर गोईंग टु गोवा.. उद्या सकाळपर्यंत मी प्लेन टिकीट्स आणि हॉटेल बुकिंग डिटेल्स रोहनला मेल करतो..ओके?” मेहता सोफ्यावरुन उठत म्हणाले…

“थॅंक्यु सो मच सर..”, रोहन आणि कबीर मेहतांना म्हणाले…

“फॉल इन लव्ह यंग मॅन.. अ‍ॅन्ड मेक अस फॉल इन लव्ह विथ युअर स्टोरी…”, कबीरच्या खांद्यावर दोन बोट वाजवत मेहता म्हणाले आणि मागे वळुन निघुन गेले…

“वन लॅक्स?”, कबीर डोळे उडवत रोहनला म्हणाला..
“मग ! सांगत होतो तुला.. अरे हा तर अ‍ॅडव्हान्स आहे.. चल कॉफी घेऊ आधी.. मी तुला बाकीचे डिटेल्स ब्रिफ करतो..”, रोहन म्हणाला..

दोघं जण क्रॉसवर्डच्या कॉफी कॉर्नरकडे निघाले.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED