वैरण भाग-I

  • 8.5k
  • 1
  • 3.5k

तानाजी उठ,वैरण आणायला जायचे आहे ,असा आवाज कानावर पडताच तानाजी खडबडून जागा झाला आणि दावं,गोणपाट कुठे आहे विचारायला लागला.हे बघून तिलोत्तमा खळखळून हसायला लागली. रात्री उशिरा घरी आला आहे. , तानाजीची आई तिलोत्तमाला बोलली.तिलोत्तमा तानाजीकडे बघून, होय रे,इतकं काम असतं का तुला? , असे चिडवण्याच्या सुरात बोलली. तुला काय माहित, कंपनीत किती काम असतंय,प्रोडक्शन ऑर्डर काढायची असते आणि प्रॉडक्शन प्लॅन कम्प्लीट करायचे असते त्याशिवाय घरी जायचं नसतं,त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम करत होतो.रात्री एक वाजता घरी आलोय आणि तू माझी चेष्टा करते काय इतकी कंपनीची काळजी असती तर कंपनीचे नाव घेतल्यानंतर उठला असतास.'वैरण' नाव घेतल्यानंतर लगेच कसं काय उठला? ते जाऊ दे,तू आज इकडे कशी काय? तानाजी आंथरूणाच्या घड्या घालत बोलला. तानाजी