मनापासून पानापर्यंत - शेवटची मिठी

  • 10.5k
  • 1
  • 2.4k

शेवटची मिठीसायंकाळचे ४ वाजले आहेत. माधव माने दोन्ही हातात सामानाच्या पिशव्या घेऊन धापा टाकत सोसायटीच्या गेटच्या आत मध्ये पाय ठेवतात. तोच त्यांची नजर समोर ढाराढूर झोपलेल्या वॉचमन कडे जाते. तसा त्यांच्यातील अधिकारी जागा होतो. आणि ते रागाने खेकसतात. ' यादव.. इथे झोपा काढायचा पगार मिळतो का रे तुला?' हे ऐकताच तोंडावर ठेवलेली टोपी डोक्यावर चढवत वॉचमन झोपेतून खडबडून जागा होतो आणि समोर थांबलेल्या माधव रावांना 'सलाम साब.. ' म्हणतो. 'कसला डोंबल्याचा सलाम. 'वो गलतीसे आँख लग गई थी..!' अरे गलतीसे इथे चोर चोरी करके निघून जाईल पण तुला कळणार नाही. आणि म्हणे वॉचमन !' वॉचमनला काय बोलावं कळत नाही. विषय