२३. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ५ राजस्थानातील प्रेक्षणीय स्थळे- ४. माउंट अबू- अप्रतिम हिल स्टेशन माउंट अबू हे राजस्थान मधले एकमेव हिल स्टेशन आहे. हिरवाईने नटलेले हे हिल स्टेशन राजस्थान मधील आवडते पर्यटन स्थळ आहे. माउंट अबू हे भारताच्या राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्यातील आरवली पर्वतरांगे मधले उंच शिखर आहे. ते गुजरात राज्याच्या पालनपूरपासून ५८ कि.मी. दूर आहे. माउंट अबू पर्वताचे २२ कि.मी. लांब आणि ९ कि.मी. रुंद असे खडकाळ पठार आहे. गुरु शिखर हे अरवली पर्वत रांगेचे सर्वात उंच शिखर आहे. ते समुद्रसपाटीपासुन १७२२ मीटर उंच आहे. माउंट अबू हे 'वाळवंटातले नंदनवन' म्हणून ओळखले जाते कारण त्यात अनेक नद्या,तलाव,धबधबे आणि सदाहरीत जंगले आहेत. माउंट अबू चे प्राचिन नाव अर्बुदांचल असे आहे. राजस्थान