फुलाचा प्रयोग.. - 4

  • 8.8k
  • 2.9k

फुलाचा तो शेजारी गब्रू राजधानीत आला होता. फुलाला फाशीची शिक्षा झाल्याचे त्याला कळले. फुलाच्या अंगरख्याच्या खिशात ती कलमे आतील, ते प्रयोग असतील परंतु कसा मिळावावयाचा तो अंगरखा? फुलाला त्याच्या कपडयांतच फाशी देतील का? सरकार स्वत:चे कपडे कशाला खर्च करील? फुलाच्या प्रेताची व्यवस्था कोण करणार? ते मांगच बहुधा ते काम करतील. त्या मांगाकडे जावे. फुलांचे कपडे त्यांनी द्यावे असे ठरवावे.