आठवणींच्या गावात भाग - २

  • 5.8k
  • 1.8k

“सायकल चे दिवस ... मध्यंतरी एका हॉटेल च्या जिम मध्ये सायकल दिसली आणी चालवायचा मोह आवरता आला नाही ..खूप ,मस्त वाटले !!आणी मग आठवले ते ..सायकल चे दिवस ..!लहान असताना पहिल्यांदा वडिलांनी सायकल चालवायला सांगितले मी म्हणाले तुम्ही शिकवा ..मग त्यांच्याच जेन्ट्स सायकल वर जवळच्या मैदानावर रोज आमचा शिकण्याचा सराव सुरु झाला तशी मी वडिलांची खूप लाडकी ..साधे मला खरचटले तरी त्यांना वाईट वाटत असे. पण सायकल शिकवताना मात्र मी सायकल मध्ये पाय घातला आणी प्याडल मारायला सुरुवात केली की ते हात सोडून देत असत ..आणी मी धाडकन पडले की त्यांना हसु येत असे मग मी रागावले