२६. महाराष्ट्रातील किल्ले- भाग १

  • 20.3k
  • 2
  • 4.5k

२६. महाराष्ट्रातील किल्ले- भाग १ किल्ले हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकाला किल्ल्यांविषयी उत्सुकता असतेच. महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. किल्ले शत्रूंपासून संरक्षण करण्यास सुलभ जावे आणि सभोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे, म्हणून बांधलेल्या वास्तू. इंग्रजीत कॅसल, फोर्ट, सिटॅडल, बर्ग वगैरे संज्ञांनी उल्लेख होतो. तर मराठीत दुर्ग, गिरिदूर्ग, द्वीपदुर्ग, जंजिरा, गढी, कोट, गड, बालेकिल्ला वगैरे संज्ञांनी या वास्तूचे वेगवेगळे प्रकार सांगितले जातात. किल्ल्यांचे बांधकाम आणि उपयोग फार प्राचीन काळापासून पूर्ण जगभर होत आला आहे. ज्या काळी अनपेक्षित परकीय आक्रमणांची भीती होती त्या काळी घरे, मंदिरे, नगरे इत्यादि तटबंदी किंवा कोट बांधून सुरक्षित ठेवण्याची सोय केली जायची. शत्रूचा हल्ला झाल्यास