फुलाचा प्रयोग - 19

  • 6.3k
  • 2.2k

‘करार नीट पाहा. हा क्षण सुंदर आहे, किती पवित्र आहे. हा क्षण माझ्या जीवनात अमर होवो असे त्याने म्हटले खरे परंतु ज्या विचारांत मग्न असता हे शब्द उच्चारले गेले, ते विचार तुमचे आहेत का? तुमच्या पोतडीत तसले विचार आहेत का? आजपर्यत तुम्ही हया आत्म्यावर नाना प्रयोग केलेत परंतु ‘हा क्षण अमर होवो. हे खरे सुख’ असे शब्द त्याच्या तोंडून तुम्हाला काढता आले का? खरे सांगा. जो क्षण अमर होवो असे हया आत्म्याने म्हटले तो क्षण दैवी होता. तो क्षण देवाचा होता. सैतानाने दिलेला नव्हता. म्हणून हा आत्मा देवाचा आहे.’ देवदूताचा नायक म्हणाला.