त्याचा स्वाभिमान

  • 5.6k
  • 1.1k

त्याचा स्वाभिमान शाळा सुरु झाल्याची घंटा झाली आणि एक, एक करुन मुले वर्गात शिरू लागली गुरुजी वर्गाच्या दारात उभे राहून सर्वाना आत पाठवु लागले . श्रीपती आत शिरला तेव्हा सरांनी पाहिले की तो “अनवाणी” आला आहे . बाहेर अक्षरशःउन्हाळा “मी” म्हणत होता . अशा वेळेस बिनचपलाचे शाळेत येणे म्हणजे खरेच कठीण होते !! त्यात श्रीपतीच्या बाबाची झोपडी गावा बाहेर होती आणि रस्ता पण दगड धोंड्यांनी भरलेला . गुरुजींनी हटकलं श्रीपतीला, “अरे काय रे चप्पल कुठाय तुझे ?” “गुरुजी काल तुटले माझे चप्पल ..खुप जुने झाल्याने दुरुस्त पण होईना मग दिले टाकुन “ “मग आता काय असा अनवाणीच येणार शाळेत