चपराक

  • 4.8k
  • 1
  • 1.4k

धड-धड-धड-धड असा आवाज करत घराकडे निघालेली जनता एस्कलेटर वरून उतरून कार्ड पंचिंग साठी लाईनीत उभी राहत होती. बघता बघता लाईन लांबच-लांब लांबत गेली. यांत्रिकी नियमाप्रमाणे समिधा पुन्हा उठली आणि कार्ड पंच करून गुहेतून बाहेर येणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषाला हसऱ्या चहेऱ्याने हाय- हॅलो करत फक्त दोन मिनिटाच्या वेळेसाठी आर्जव करत होती. दोन काय अगदी एका मिनिट हि लागणार नव्हता तिला, क्रेडिट कार्ड ची माहिती सांगण्यासाठी.तीच हे रोजच्च काम, 'क्रेडिट कार्ड विकणे'. पण लोकांना घरी जायची इतकी गडबड कि ते समिधाला अगदी हाताने दूर लोटत तिला ओलांडून समोर जात होती. याही गाडीत तिला कुठलच सावज भेटलं नव्हतं. हो 'सावजच', असे तिच नव्हे