आपले कर्माचे फळ येथेच मिळेल

  • 10k
  • 1.8k

           माझे सत्तर वर्षाचे जीवनात काही असे अनुभव आलेत कि ,त्या अनुभवांना शेर केलो तर , बरेच जणांना उत्साहदायक मार्गदर्शन मिळेल असं मला वाटतो. म्हणून हा एक पहिला प्रयत्न .            मी एक साधा कारकूनाचा मुलगा. आई, वडिलांच्या पुण्याई मुळे इंजिनीरिंगला सरकारी सीट, माझ्या स्वतःच्या गावात मिळाली, पन्नास वर्षां पूर्वी . पाच वर्षात मेकॅनिकल चा पदवी घेऊन बाहेर पडलो .त्या काळात औद्योगिक मंदी असल्या मुळे नौकरी मिळणे फार अवघड  होता.सहा महिने पर्यंत नौकरी सोडा, मुलाखतीचा सुद्धा चिन्ह दिसेना.कंटाळून बहिणीचे गावाला जाऊन आराम करत असताना, एक दिवस माझा धाकटा भाऊ कलबुर्गीहून येवून सांगतो