टाईपराईटर- एक शापित खोली

  • 10.8k
  • 1
  • 3.7k

दि. 24-04-09, गावाकडचे तीन विद्यार्थी पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यास कोलकत्ताला आलेत. तिघेही जिव्हाळ्याचे मित्र, एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणारे. तिघांनाही एकमेकांच्या आवडी, सीक्रेट, कमजोरी लहानपणापासूनच ठाऊक! एकमेकांत लपवण्यासारखे काही राहिले नाही. खरंतर ह्यांच्यात भांडण होणं म्हणजे वाळवंटात पाणी मिळण्यासारखेच. खूप कमी आशंका. पण आता शहरात मात्र ह्यांच्यासोबात एक वेगळीच घटना घडणार होती, जे तिघांनीही कधी स्वप्नातही बघितले नसावे. एकाच महाविद्यालयात तिघांनीही ऍडमिशन घेतले. आता फक्त राहायसाठी एक खोली बघायची होती. ह्यांना इथे यायला जरा उशीर झाल्याने रूम शोधता मिळत न्हवती. रूम शोधून शोधून संध्याकाळ झाली पण तिघे राहण्यासारखी सिंगल खोली मिळत न्हवती. एक आखरी चान्स म्हणून एका घरी चौकशी करायला शिरलेत.