२८. महाराष्ट्रातील किल्ले- ३

  • 8.3k
  • 2.8k

२८. महाराष्ट्रातील किल्ले- ३ * महाराष्ट्रात असलेले किल्ले- २. राजगड- 'राजगड' हा सुद्धा शिवाजी महाराजांचा एक महत्वपूर्ण किल्ला होता. किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याची पहिली राजधानी होती. स्वत: महाराजांनी या गडाची उभारणी केली होती. इ.स. १६४५ ते १६७२ जवळजवळ २७ वर्षांचा कालखंड महाराजांनी गडावर घालविला होता. महाराजांची काही काळासाठी ‘राजगड’ ही राजधानी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला ‘राजगड’होता. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ किलोमीटर अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ किलोमीटर अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून