२९. महाराष्ट्रातील किल्ले- ४

  • 11.9k
  • 3.2k

२९. महाराष्ट्रातील किल्ले- ४ * महाराष्ट्रातले किल्ले ३. शिवनेरी किल्ला- शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर येथे आहे. ह्या किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग आहे. हा किल्ला तसा फार मोठा नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे. आणि हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. शिवनेरीचा हा किल्ला अतिशय प्राचीन किल्ला आहे. हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ आणि पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. शिवनेरी किल्ला हा सुमारे १०७० मीटर उंच असून दक्षिण - उत्तर दीड किलोमीटर पसरलेला आहे. किल्ल्याचा दक्षिणेकडील भाग अर्धगोलाकृती