३०. महाराष्ट्रातील किल्ले- ५ महाराष्ट्रातले किल्ले ४. प्रतापगड- पौराणिक व एतिहासिक वारसा लाभलेले महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील पर्यटकांच आवडत पर्यटन स्थळ आहे. आणि इथे जवळच प्रतापगड हा लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे. महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत हा किल्ला उभा आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस सुमारे १३ किमी. वर आहे. शाहीर तुळशीदास यांनी म्हणल्याप्रमाणे ‘राजगड राजाचा, प्रतापगड जिजाईचा!’.. म्हणजेच राजमाता जिजाबाईंचा सर्वांत आवडता किल्ला हा प्रतापगड होय. नीरा आणि कोयना नदीच्या परिसरात मराठ्यांनी सत्ता मिळवली होती त्याच रक्षण करणे गरजेचे होते. त्यासाठी मजबूत किल्ला